Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षकांना भेटायला गेले अन् तेवढ्यात होत्याचं नव्हतं झालं! नीरा कालव्यात बहीण-भावाचा दुर्दैवी अंत; परिसरात हळहळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 10 April 2026, 13:33

Pune News : पुणे : शिक्षकांना भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारी किरण आणि काजल हे दोघे दुचाकीवरून फलटण येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेले होते. तेथे आपले काम पूर्ण करून ते घरी निघाले, मात्र बराच वेळ झाला तरी ते परतले नाहीत. त्यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत दोघे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

दरम्यान, शोध सुरू असतानाच माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरात नीरा उजवा कालव्यात दोन मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली. धर्मपुरी ते गुरसाळे दरम्यान कालव्यात हे मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसले. माहिती मिळताच नातेपुते पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी हे मृतदेह बेपत्ता असलेल्या किरण आणि काजल यांचेच असल्याचे स्पष्ट झाले.

किरण काकासाहेब चोपडे, वय 26, आणि काजल काकासाहेब चोपडे, वय 23, अशी मृतांची नावे असून ते बारामती तालुक्यातील मेखळी गावचे रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, दोघांचा मृत्यू कालव्यात बुडाल्याने झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही मृतदेहांचे नातेपुते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून नंतर ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

 

या घटनेमुळे चोपडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच वेळी घरातील दोन तरुण सदस्यांचा मृत्यू झाल्याने मेखळी गावातही शोककळा पसरली आहे. हा अपघात आहे की इतर काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचा ‘ड्रग्स’ तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक! धायरी आणि खडकीत 10 लाखांहून अधिकचा गांजा जप्त

Sunday, 14 June 2026, 15:10

सुपा पोलिसांची तत्परता! 12 तासांत शोधून दिले हरवलेले सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र

Sunday, 14 June 2026, 14:28

महावितरणची स्मार्ट मीटर मोहीम! आता वीजबिल वाढीच्या तक्रारींना पूर्णविराम; ग्राहकांसाठी सवलतीचीही घोषणा

Sunday, 14 June 2026, 14:17

आरटीई प्रवेश प्रक्रियेला दिलासा; प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या टप्प्यास १९ जूनपर्यंत मुदतवाढ

Sunday, 14 June 2026, 13:35

पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा; कारवर उड्या मारत सनरूफ फोडले

Sunday, 14 June 2026, 13:23

पुण्यात मध्यरात्री घडलं भयंकर! अंधाराचा फायदा घेत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला अन्…

Sunday, 14 June 2026, 13:18
Next Post

इंदापुरातील जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या लाचखोर सचिवाला रंगेहात पकडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.