पुणे : तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहात? तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधीच असणार आहे. कारण, आता राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट, मुंबई येथे आर्थिक, खरेदी, सामाजिक/डीआरएम क्षेत्रातील तज्ञ या पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी 5 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
जाणून घ्या भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : क्षेत्रातील तज्ञ (आर्थिक, खरेदी, सामाजिक/डीआरएम).
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : 1,70,000 पर्यंत
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 27 डिसेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याचा पत्ता : राज्य प्रकल्प संचालक, राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट (SPIU), राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्प (NCRMP), फ्री प्रेस जौमल मार्ग. नरिमन पॉइंट, मुंबई – 400021.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.maharashtra.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.