Job Alert : पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला गडचिरोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी 18 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवाराला ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर.
– वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : गडचिरोली.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 18,000/- ते रु. 35,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023.
– जर तुम्हाला या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती हवी असेल तर अधिकृत वेबसाईट https://www.zpgadchiroli.in/ ला भेट देऊन माहिती घेता येऊ शकणार आहे.