पुणे : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधाला सुरुवात होते. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण आता तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज येथे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शिक्षक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदावर ही भरती होणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अहमदनगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 305 पेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://ajmvps.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : शिक्षक आणि सहाय्यक प्राध्यापक.
– एकूण रिक्त पदे : 305+ पदे.
– नोकरीचे ठिकाण : अहमदनगर.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 24, 25, 26, 27 जुलै 2024.
– मुलाखतीचा पत्ता : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज (संस्थेचे कार्यालय)