पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 12 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
‘सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स’ विभागात विशेष सरकारी वकील या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत आता पद भरले जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज करता येणार आहे. त्यासाठी सहाय्यक आयुक्त (कायदेशीर), वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आयुक्त कार्यालय, एन-5 टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद-431003 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विशेष सरकारी वकील.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मार्च 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.cgstnagpur.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.







