पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण, आता तुम्हाला ठाणे येथील वनविभाग कार्यालयात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वनविभाग कार्यालय, ठाणे येथे मानद वन्यजीव रक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2025 ही असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.mahaforest.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मानद वन्यजीव रक्षक
– नोकरीचे ठिकाण : ठाणे, नवी मुंबई, मुंबई उपनगरे, पालघर, रायगड.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 03 एप्रिल 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 एप्रिल 2025.