पुणे, ता. १3 : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती अंतर्गत प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 1 लाख 85 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत. पण अनुभवी उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
– पदाचे नाव : प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक.
– रिक्त पदे : 18 पदे.
शैक्षणिक पात्रता काय असावी?
प्राध्यापकांसाठी MD किंवा DNB
सहाय्यक प्राध्यापकांसाठी MS/ DNB / MD असणे गरजेचे आहे.
– नोकरी ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : प्राध्यापकांसाठी – रु. 1,85,000/-दरमहा, सहयोगी प्राध्यापक – रु. 1,70,000/-दरमहा.
– अर्ज करण्याचं माध्यम : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2023.
– अर्ज कुठं करावा?
या पदांसाठी अधिकृत वेबसाईट http://www.bjmcpune.org/ वर जाऊन अर्ज करता येणार आहे.