पुणे : पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात समुपदेशक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 20 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. 30 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
या पदासाठी मुलाखत ही मनोविकृतीशास्त्र विभाग, बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.bjmcpune.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.