पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, जळगाव महापालिकेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
जळगाव महापालिकेत शहर समन्वयक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला जळगाव येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : शहर समन्वयक.
– एकूण रिक्त पदे : 1 पद.
– नोकरीचे ठिकाण : जळगाव.
– वेतन / मानधन : दरमहा 45,000 रुपये
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 11 जून 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जून 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : जळगाव म.न.पा. स्वच्छता विभाग आठवा मजला, जळगाव, महाराष्ट्र
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 25 जून 2024 सकाळी 11:00 वाजता.
– मुलाखतीचा पत्ता : उपायुक्त (आरोग्य) म.न.पा. मजला क्र. २.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट
http://www.jcmc.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.