Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कामगारांसाठी महत्वाची बातमी! ९ तासांऐवजी १२ तास काम करावे लागणार, सरकारचा मोठा निर्णय

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 4 September 2025, 9:56

महाराष्ट्र : राज्य सरकारने कामगारांच्या दैनंदिन कामाच्या तासांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कामगार विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता, ज्याला आता मान्यता मिळाली आहे. यानुसार, राज्यातील कारखाने आणि दुकानांमधील कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास ९ वरून १२ तासांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या ‘Ease of Doing Business’ धोरणाला अनुसरून हे बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे उद्योगांना अधिक लवचिकता मिळेल आणि कामगारांना नियोजित व पारदर्शक कामकाजाचा लाभ होईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. उद्योग आणि कामगार यांच्यातील समन्वय साधण्यासाठी हे बदल महत्त्वपूर्ण ठरतील, असा दावा सरकारने केला आहे. बुधवारी (दि.3) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

कारखाने अधिनियम १९४८ च्या कलम ६५ अंतर्गत कारखान्यातील कामगारांचे दैनंदिन कामाचे तास ९ वरून १२ तासांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. यापूर्वी ५ तासांनंतर ३० मिनिटांचा विश्रांतीचा कालावधी मिळत होता, तो आता ६ तासांनंतर ३० मिनिटांचा करण्यात आला आहे. तसेच, आठवड्याचे एकूण कामाचे तास ४८ वरून ६० तासांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

दुकानांमधील कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास ९ वरून १० तासांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. तर तातडीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ तासात साडेदहा तासांवरून १२ तासांपर्यंत वाढवला आहे.

 

कामगारांच्या अतिरिक्त कामाच्या (ओव्हरटाइम) तासांची कमाल मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे कामगारांना जास्त आर्थिक लाभ मिळणार आहे. तथापि, शासकीय परवानगीशिवाय कारखाने स्वतःहून असे बदल करू शकणार नाहीत. याशिवाय, आठवड्याला ४८ तासांच्या कामाची मर्यादा ओलांडता येणार नाही, असे कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले आहे.

जास्तीचे काम करणाऱ्या कामगारांना योग्य मोबदला आणि पगारी सुट्ट्या मिळाव्यात, यासाठी नव्या नियमांमध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे कामगारांना आर्थिक लाभ आणि कामाच्या ठिकाणी स्पष्टता मिळेल, असे फुंडकर यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, कामगारांचे हक्क आणि उद्योगांची उत्पादकता यांचा समतोल राखण्यासाठी हे बदल महत्त्वाचे ठरतील, असे सरकारचे म्हणणे आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयात खिडकीला कपड्यांची दोरी बांधली अन्...; महिला रुग्णाने घेतला धक्कादायक निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp