पुणे : कर्मचारी निवड आयोगाद्वारे जवळपास 20 हजार पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीची अधिकृत PDF जाहिरात उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्रातील लाखो पदवीधर उमेदवारांना हि एक नोकरीची सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित गट ब आणि गट क पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा आहे.
SSC CGL 2022 अधिसूचना SSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच ssc.nic.in वर प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी SSC वेगवेगळ्या पात्रता निकषांवर आधारित विविध परीक्षा घेते. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2022 आहे
पदाचे नाव – गट ब आणि क अधिकारी विविध पदांच्या भरती (सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, प्राप्तिकर निरीक्षक, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, निरीक्षक परीक्षक, सहायक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक (सीबीआय), निरीक्षक (पोस्ट विभाग आणि केंद्रीय अंमली पदार्थ विभाग) , सहायक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, वरिष्ठ सचिवीय सहाय्यक, कर सहाय्यक)
पद संख्या – 20,000
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्थांमधील अ-तांत्रिक, गट ‘ब’ आणि गट ‘क’ अराजपत्रित पदांच्या विविध रिक्त पदांसाठी SSC CGL संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2022 ची अधिकृत अधिसूचना 17 सप्टेंबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. SSC CGL 2022 ही राष्ट्रीय-स्तरीय परीक्षा आहे आणि ती वर्षातून एकदा कर्मचारी निवड आयोगाद्वारे घेतली जाते.