पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण, अजूनही तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, ‘सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी’ येथे नोकरीची संधी मिळू शकते.
‘सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी’, पुणे येथे ही भरती केली जात आहे. त्यानुसार, आता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. ज्युनियर रिसर्च फेलो/प्रोजेक्ट असोसिएट- I/प्रोजेक्ट स्टाफ-I, प्रोजेक्ट क्लर्क/प्रशासकीय सहाय्यक, बिझनेस कन्सल्टंट/सीईओ यांसारख्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु होत आहे.
यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण सात रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो/प्रोजेक्ट असोसिएट- I/प्रोजेक्ट स्टाफ-I, प्रोजेक्ट क्लर्क/प्रशासकीय सहाय्यक, बिझनेस कन्सल्टंट/सीईओ.
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत (बिझनेस कन्सल्टंट/सीईओ) : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख (बिझनेस कन्सल्टंट/सीईओ) : 22 नोव्हेंबर 2024.
– निवड प्रक्रिया (ज्युनियर रिसर्च फेलो/प्रोजेक्ट असोसिएट- I/प्रोजेक्ट स्टाफ-I, प्रोजेक्ट क्लर्क/प्रशासकीय सहाय्यक) : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 21 नोव्हेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट), पंचवटी, पाषाण रोड, पुणे-४११००८
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://cmet.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.