पुणे : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 16 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. खुलाप्रवर्ग 18 ते 38 वर्षे, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग, अनाथ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) : 18 ते 43 वर्षे अशी मर्यादा असणार आहे.
तसेच पुणे महापालिकेत प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी (वित्त), संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बहुउद्देशीय सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी (आयटी), डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक, संप्रेषण विशेषज्ञ, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांसारखी पदेही आरोग्य विभागात भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी www.arogya.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.