पुणे : शिक्षण विभागात तुमचं नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 45 हजारांपर्यंत पगार मिळू शकेल.
परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी तुम्हाला कुठंही जाण्याची गरज भासणार नाही. कारण, विद्यापीठाकडून वेबसाईट लाँच करण्यात आली असून, त्यानुसार, http://www.vnmkv.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : परभणी.
– शैक्षणिक पात्रता : एम. टेक. ऍग्रिलमध्ये. इंजी. नेट/सेट किंवा पीएच.डी. ऍग्रिल मध्ये. इंजी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 45,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– मुलाखतीची तारीख : 11 ऑक्टोबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : असोसिएट डीन आणि प्राचार्य, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, VNMKV, परभणी-431402 (MH).