पुणे : नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून संबंधित उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे असोसिएट प्रोफेसर या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात 59 वयापर्यंतच उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या प्रकियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.iggmc.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यासाठी 24 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर अधिष्ठाता कार्यालय, आस्थापना विभाग, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या ठिकाणी सदर अर्ज पाठवावे लागणार आहेत.