पुणे : भारतीय लष्करात नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण, अजूनही तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. प्रादेशिक सेना गट मुख्यालयात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कारण, या विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
पुणे येथील प्रादेशिक सेना गट मुख्यालय, दक्षिणी कमांड येथे ही भरती केली जात आहे. त्यानुसार, आता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) यांसारख्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. सदर वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे अशी असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई).
– रिक्त पदे : 02 पदे.
– वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक सेना गट मुख्यालय दक्षिणी कमांड, ASI समोर, मुंढवा रोड, घोरपडी, पुणे-411001.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://territorialarmy.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.