पुणे, ता.२२ : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे विविध पदांवर भरती केली जात आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली जाणार असून, उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी नाशिक येथे जावे लागणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिकमध्ये प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांसह विविध पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 219 रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
– कोणत्या पदांवर भरती केली जाणार?
मायक्रोबायोलॉजिस्ट, फिजिशियन, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT स्पेशलिस्ट, SNCU मेडिकल अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 219 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.
– अर्ज करण्याची पद्धत – या भरती प्रक्रियेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 20 ते 31 ऑक्टोबर 2023.
– वयोमर्यादा काय असेल?
किमान वय 18 वर्षे, खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे, मागासवर्गीय – 43 वर्षे, वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) व विशेषज्ञ अतिविशेषज्ञ – 70 वर्ष राहील.
– मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक.
– कुठं मिळेल अधिक माहिती?
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://zpnashik.maharashtra.gov.in/ ला भेट देऊन घेता येऊ शकणार आहे.