पुणे : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विभाग. सरकारी विभागात तुमचं नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण, वस्तू आणि सेवा कर विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकेल.
वस्तू आणि सेवा कर विभागात गट ‘ब’ (अराजपत्रित) संवर्गातील राज्यकर निरीक्षक या पदांवर सेवानिवृत्त या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे. उमेदवाराची निवड ही चाचणी परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : गट ‘ब’ (अराजपत्रित) संवर्गातील राज्यकर निरीक्षक या पदांवर सेवानिवृत्त.
– रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : ठाणे ग्रामीण विभाग, भाईंदर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची अखेरची तारीख : 23 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : आस्थापना अधिकारी, राज्यकर सहआयुक्त (प्रशासन), ठाणे ग्रामीण विभाग, भाईंदर यांचे कार्यालय, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड बिल्डिंग, पहिला मजला, रेल्वे फाटक रोड, भाईंदर (पश्चिम) ४०११०१.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mahagst.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.