पुणे : नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे विशेषज्ञ OBGY / स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन यांसारख्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 99 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सदर मुलाखत ही 8 ऑक्टोबर रोजी कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने) जिल्हा परिषद नाशिक येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.