पुणे : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. कारण, या ठिकाणी काही रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ जीएसटी लेखापरीक्षक या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 ही असणार आहे. यामध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या प्रकियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.mahasecurity.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : जीएसटी लेखापरिक्षक.
– नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालकांना (MSSC), महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, 32 वा मजला, केंद्र 1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-400 005