पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान (MAHAPREIT) येथे मुख्य वित्त अधिकारी आणि अनुपालन अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
MAHAPREIT येथे ही भरती केली जात आहे. मुख्य वित्त अधिकारी आणि अनुपालन अधिकारी या पदासाठी उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या पदासाठी ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मुख्य वित्त अधिकारी आणि अनुपालन अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 नोव्हेंबर 2023.
– अर्ज कुठं पाठवायचा : संचालक (ऑपरेशन्स), महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड, मुंबई, B-501/502, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, 5 वा मजला, ट्रेड सेंटरच्या पुढे, BKC, वांद्रे (E), मुंबई – 400 051.
– ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी – [email protected]
कुठं मिळेल अधिक माहिती?
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिकृत वेबसाईट https://mahapreit.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.