पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे वकील या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला रत्नागिरी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.zpratnagiri.org/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वकील.
– नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी.
– वयोमर्यादा : वय ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषद भवन, रत्नागिरी ४१५६१२.