सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ने मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. संस्थेने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी तब्बल 976 जागांसाठी अधिसूचना जारी केली असून अर्ज प्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 27 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या पदांसाठी आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, संगणक अभियांत्रिकी किंवा आयटी विषयात पदवी असणे आवश्यक असून, उमेदवारांकडे GATE स्कोअर देखील असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादेनुसार उमेदवारांचे कमाल वय 27 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गासाठी मात्र विशेष सवलतींचा लाभ देण्यात आला आहे. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC उमेदवारांना 3 वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षे वयोमर्यादेची सूट मिळणार आहे.

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 40000 ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत मासिक वेतनश्रेणी दिली जाईल. याशिवाय विविध भत्ते आणि सुविधा मिळणार असल्याने ही नोकरी अधिक आकर्षक ठरणार आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी http://www.aai.aero या अधिकृत वेबसाइटवर जाऊन “RECRUITMENT OF JUNIOR EXECUTIVES THROUGH GATE” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नोंदणी करून युजर आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करून वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरावी. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करावा आणि त्याची प्रिंटआउट सेव्ह करून ठेवावी.
दरम्यान, नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन अंतिम तारखेपूर्वी म्हणजेच 27 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.







