नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ अर्थात SSC मध्ये कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) पदांवर मोठी भरती केली जाणार आहे. अभियांत्रिकीनंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असणार आहे.
किती पदे भरणार?
कनिष्ठ अभियंतापदाच्या 1342 जागा भरल्या जाणार
शैक्षणिक पात्रता काय?
कनिष्ठ अभियंतापदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अभियांत्रिकीच्या संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा काय?
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी अर्जातील दुरुस्ती करता येईल.
कधी असेल परीक्षा?
कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा 2023 ऑक्टोबरमध्ये आयोजित केली जाईल. ही परीक्षा संगणकावर आधारित असेल.
वयोमर्यादा काय?
किमान वयोमर्यादा 30 तर इतर पदांसाठी कमाल वयोमर्यादा – 32 असणार आहे. तर SC/ST/OBC/PH/माजी सैनिकांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत अतिरिक्त सवलत मिळणार आहे.