पुणे : आपल्या बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. अनेकदा संधी हुकतेच. पण आता ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एकात्मिक जोखीम व्यवस्थापन, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ आणि इतर विभाग ही पदे आता भरली जाणार आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 195 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये 10 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून, 26 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.bankofmaharashtra.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : एकात्मिक जोखीम व्यवस्थापन, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ आणि इतर विभाग.
– एकूण रिक्त पदे : 195 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 10 जुलै 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, ‘लोकमंगल’, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005.