पुणे : चांगली नोकरी मिळावी असे सगळ्यांनाच वाटत असतं. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रकियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट, मुंबई येथे आर्थिक, खरेदी, सामाजिक/डीआरएम क्षेत्रातील तज्ञ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज 27 डिसेंबर 2023 पासून सुरू झाले आहेत. तर 5 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या भरती अंतर्गत एकूण तीन पदे भरली जाणार आहेत.
जाणून घ्या भरती प्रक्रिया…
कुठं निघाली भरती?
– राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट, मुंबई.
– पदाचे नाव : क्षेत्रातील तज्ञ (आर्थिक, खरेदी, सामाजिक/डीआरएम).
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन: रु. 1,70,000/-
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 27 डिसेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जानेवारी 2024.
– अर्ज पाठवायचा पत्ता : राज्य प्रकल्प संचालक, राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट (SPIU), राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्प (NCRMP), फ्री प्रेस जौमल मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई-4000 21.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.maharashtra.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.