नोकरी मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. मग त्यात पहिली नोकरी असेल तर काय करावं काय नको असं होत असतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक फ्रेशर्स खर्च भागविण्यासाठी पहिला जॉब करतात. मात्र, तुम्ही देखील पहिला जॉब करणार असाल तर काही गोष्टींकडे लक्ष द्या.
कोणतीही चांगली कंपनी फक्त पैसे कमावण्याचे उद्दिष्ट असलेल्या उमेदवाराला कामावर ठेवत नाही. तर त्याच्याकडून चांगल्या अपेक्षा ठेवल्या जातात. पहिली नोकरी करताना विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहा. फ्रेशर म्हणून तुम्ही उत्साही आणि बुद्धिवादी असायला हवे. तसेच तुमच्या करिअरमध्ये अमाप संधी भरलेल्या आहेत. हे तुम्ही समजून घेण्याची गरज आहे.
याशिवाय, एखाद्या कंपनीत तुम्ही किती काळ काम केले किंवा तुम्ही कॉलेजात किती गुण मिळविले हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव करिअरच्या प्रवासात जमा केले याला महत्त्व आहे. यामुळेच जीवनभर विद्यार्थ्यांच्या भूमिकेत राहण्याचे उद्दिष्ट ठेवा. या अशा गोष्टींकडे लक्ष दिल्यास फायद्याचे ठरते.