युनूस तांबोळी
contract recruitment : शिरूर : राज्यात सध्या सरकारी नोकर भरती सुरू आहे. या भरतीसाठी अत्यल्प जागा काढल्या जातात. राज्यातील लाखो बेरोजगार तरुण नोकरी मिळेल, या भाबड्या आशेने अर्ज करतात. भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधून कोट्यवधीचा निधी संकलित केला जातो. या प्रक्रीयेलाही पूर्ण तयारीनिशी तरुण सामोरे जातात, मात्र, अनेकदा ऐन भरतीवेळी सरकार नवनवीन आदेश काढून तरुणांना संभ्रमात टाकते, यामुळे पदरी निराशाच पडते. सध्या कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरतीचा आदेश आला आहे. आता बेरोजगार तरुण सावध होत आहे. उठ तरुणा जागा हो, आता तरी शहाणा हो, कंत्राटी पदभरतीला विरोध कर… असेच काहीसे चित्र दिसत आहे.
शिक्षणासाठी मोठा खर्च…
सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत शिक्षण खेडोपाडी पोहोचले आहे. खेड्यातील पालक देखील मुलांच्या शिक्षणाप्रती जागरूक झाले आहेत. प्राथमिक शिक्षणापासून पालक जबाबदार पालकत्वाच्या भूमिकेत दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील पालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मुलांना तालुक्याच्या ठिकाणी पाठवत आहेत. विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तालुकास्तरावर देखील शिकवणी वर्ग सुरू आहेत. (contract recruitment) पालक पदरमोड करून, पाल्याच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करताना दिसत आहेत.
शिक्षण घेऊन नोकरी नाही…
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असली, तरी उच्चतम पदवी घेऊन देखील नोकरी मिळण्याची हमी राहिलेली नाही. (contract recruitment) अनेक क्षेत्रांमध्ये संगणकीकृत काम होत असल्याने, मनुष्यबळाची गरज कमी होत आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या कमी खर्चात जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने कर्मचारी कपातीचे धोरण आखले आहे. परिणामी तरुण वर्गात बेरोजगारी वाढत आहे.
सरकारी कंत्राटी पदभरती
सरकारी कार्यालयातील अनेक विभागांमध्ये रिक्त पदे आहेत. सरकार नोकर भरती करणार असल्याचे सांगते; प्रत्यक्षात नोकर भरती होताना दिसत नाही. काही पदांसाठी खासगी कंपन्यांमार्फत परीक्षा घेऊन पदभरती होत आहे. मात्र, या परीक्षांमध्ये पारदर्शकता नसल्याने तरुणांचा हिरमोड होत आहे. (contract recruitment) सोशल मिडीयावर सध्या पदभरतीच्या जाहिराती येत आहेत. यासाठी ९०० ते १००० रुपये शूल्क आकारले जाते. या परीक्षांसाठी वर्षभर तरुणांना प्रतिक्षेत बसावे लागते. अनेकदा पेपरफुटीला सामोरे जावे लागते. सध्या सरकारी पदभरती न करता कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जात आहे. हे अत्यंत धोकादायक व असंवैधिक आहे. कंत्राटी पद्धतीने नोकर भरती रद्द करावी, यासाठी तरुण लढा देण्याच्या मनःस्थितीत आहेत.
परीक्षा घेणाऱ्या कंपन्या कोणाच्या?
कंत्राटी भरतीमुळे सरकारी कामकाजातील गोपनीयता व सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. पदभरतीचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्या या आमदार, खासदार, राजकीय उच्चपदस्थ किंवा नोकरशाहीशी संबंधित लोकांच्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून मोठा आर्थिक गैरव्यवहार होऊ शकतो. तत्काळ भरल्या जाणाऱ्या पदांसाठी कंत्राटी पद्धत अवलंबणार असेही सरकार सांगते. मात्र, यामुळे अकरा महिने काम करून तुम्हाला घरी बसावे लागण्याचा धोका आहे. त्यासाठी कायमस्वरूपी पद भरती करण्याकडे सरकारचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन, हा निर्णय त्वरीत रद्द करावा, अशी बेरोजगार तरुणांची भावना आहे.
उठ तरुणा जागा हो…
दरम्यान, गेल्या २० वर्षांत भरती न झाल्याने सरकारी कार्यालयावर कामाचा बोजा आहे. त्यातच सरकारी कार्यालयात ४५ टक्के नोकरदार आहेत. त्यामुळे ५५ टक्के सरकारी नोकर भरती होणे आवश्यक आहे. त्यामुळे ही पदे भरण्यासाठी तरुणांनी आग्रह केला पाहिजे. (contract recruitment) तरुणांनी जागरूक होऊन, कंत्राटी पद्धतीला विरोध केला पाहिजे. जिद्दीने कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आता समाजानेच पुढाकार घेण्याची गरज आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :