Employment News : पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात, तर काही विद्यार्थी नोकरीच्या शोधात असतात. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी कोणत्या सरकारी खात्यात नोकऱ्या उपलब्ध आहेत हे त्यांना माहीत असल्यास भरती प्रक्रीया सुलभ होऊ शकते. यासाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक भरती करणारा सरकारी विभाग कोणता, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रेल्वेतर्फे प्रत्येक झोनमध्ये शिकाऊ पदांसाठी भरती सुरू असते
भारतीय रेल्वेतर्फे प्रत्येक झोनमध्ये शिकाऊ पदांसाठी भरती सुरू आसते. (Employment News) काही पदांसाठी, जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रता दहावी आणि बारावी उत्तीर्ण आहे, तर काही पदांसाठी, हायस्कूल आणि इंटरमिजिएटसह आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे.
१५ वर्षे ते २४ वर्ष वयोगटातील तरुण रेल्वेतील अप्रेंटिस म्हणून अर्ज करू शकतात. १५ वर्षांखालील आणि २४ वर्षांपेक्षा जास्त वयाचे तरुण अर्ज करू शकत नाहीत. वयोमर्यादा कधीपासून मोजली जाईल हे रेल्वेतर्फे ठरवले जाते.
रेल्वेच्या ज्या झोनतर्फे शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी जाहिरात दिली जाते. (Employment News) त्या झोनच्या अधिकृत वेबसाइटद्वारे, जे तरुण पात्र आहेत आणि नोटिफिकेशननुसार निर्धारित मानके पूर्ण करतात, ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी रेल्वे परीक्षा घेत नाही. गुणवत्ता आणि कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे निवडलेल्या उमेदवारांची निवड केली जाते. शैक्षणिक पात्रतेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते. (Employment News) अधिक माहितीसाठी उमेदवार ऑफिशिअल वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.
* अशा प्रकारे तुम्ही अप्रेंटिसभरतीसाठी अर्ज करू शकता
– सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे.
– रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– सूचना वाचा आणि वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
– रेल्वे अप्रेंटिस भरती फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
– भरती फॉर्म भरा आणि सबमिट करा.
– फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा ; आरटीओच्या कामाला येणार गती
Pune News : पत्रकार गोळीबार प्रकरणी बंगळुरुमधून शॉपशुटर श्रेयश मतेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune News : बोरघाटात मालवाहतुकीच्या वाहनांची धडक; विद्यार्थ्यांसह तिघे जखमी