पुणे : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या नागपूर विभागात अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, इच्छुक उमेदवारांनी त्वरीत अर्ज करावा.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण विभागात शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या पदासाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या पदांसाठी 21 जून 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, 27 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री).
– रिक्त पदे : 13 पदे.
– शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण.
– नोंदणी क्रमांक : E10162700104.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट
https://www.mahatransco.in/ वरून माहिती घेता येणार आहे.