पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे वैज्ञानिक सहाय्यक-बी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवार या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.barc.gov.in/ वरून माहिती घेऊ शकणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक-बी.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. जैविक विज्ञान.
– वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 07 जून 2024.
– मुलाखतीचा पत्ता : कॉन्फरन्स रूम नंबर 2, तळमजला, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई-400 094.