Command Hospital पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये डायलिसिस तंत्रज्ञ या पदावर भरती केली जात आहे. यासाठी प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. ही मुलाखत उद्या म्हणजेच सोमवारी (दि.९) होणार आहे.
– पदाचे नाव : डायलिसिस तंत्रज्ञ
– रिक्त पदे : 1 पद.
– काय असावी शैक्षणिक पात्रता?
नामांकित संस्थेतून डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम केलेला असावा. किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. मागील काम केलेल्या संस्थेमधील प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
– पगार – दरमहा 16,000/- रुपये
– अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– नोकरीचे ठिकाण : पुणे
– मुलाखतीची तारीख : 9 ऑक्टोबर 2023.
– मुलाखतीची पत्ता : नेफ्रोलॉजी विभाग, कमांड हॉस्पिटल (SC), कोंढवा, पुणे-411040.
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://afmc.nic.in/ ला भेट देऊन माहिती घेता येऊ शकणार आहे.