पुणे : शासकीय विभागात नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यानुसार, अनेकांकडून प्रयत्न देखील केले जातात. मात्र, तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर आता ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण, चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत घरबसल्या अर्ज करता येणार आहे.
चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेत सल्लागार, दस्तऐवजीकरण तज्ञ आणि आयटी सल्लागार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चंद्रपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण चार रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 70 हजारांपर्यंत पगारही मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सल्लागार, दस्तऐवजीकरण तज्ञ आणि आयटी सल्लागार.
– एकूण रिक्त पदे : 04 पदे.
– नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 60,000/- ते रु. 70,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://zpchandrapur.co.in/ वरून माहिती घेता येणार आहे.