सुभाष इचके (राज्यकर आयुक्त-जीएसटी)
शिरूर : स्पर्धा परिक्षेला सामोरे जात असताना मनाची तयारी करणे आवश्यक आहे. प्राथमिक शाळेतून तुम्ही काय ज्ञान घेतले. त्यातून काय प्राप्त केले. याला सगळ्यात जास्त महत्व आहे. शिक्षण घेताना आपण दरवर्षी पास किंवा उत्तीर्ण असे प्रमाणपत्र मिळवत असतो. त्याला पुढिल जीवनात काहीच महत्व नसते. त्या वर्षाच्या कालखंडात तुम्ही काय आत्मसात केले याला देखील सगळ्यात महत्व आहे. या काळातील पाठ्यक्रम, इतीहास, भुगोल, समाजशास्त्र सारखे विषय आत्मसात करा. जगाचा अभ्यास करत असताना तुमची आत्मसात करण्याची वृत्ती तुम्हाला भविष्यातील यश मिळवून देणार आहे. (Career News)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षात तुमच्या पहिली ते दहावी पर्यतच्या विषयावर देखील प्रश्न तयार केलेल असतात. मागिल घेतलेले ज्ञान, सामाजीक प्रश्न, चालु घडामोडी, स्वतःचे ज्ञान व देशाचा, जगाचा अभ्यास यावरच हे प्रश्न अवलंबून असतात. यासाठी मनात साठवलेले ज्ञान कसे उपयुक्ततेत आणू शकता. यावरच ही परीक्षा अवलंबून असते.(Career News)
प्राथमिक परिक्षा, मुख्य परिक्षा व मुलाखत यामधून तुम्हाला या पदापर्यंत पोहचता येते. त्यासाठी खूप परिश्रम घेणे गरजेचे आहे. या परिक्षेत एक मार्क कमी असला तरीही तुम्हाला पहिल्यापासून पुन्हा परिक्षंची तयारी करावी लागते. जो पर्यत तुम्ही पुर्ण यशस्वी होत नाही. तोपर्यंत तेमचे ध्येय तुम्हाला मिळत नाही. यासाठी या वयातच तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. ध्येयपुर्तीसाठी चिकाटी व जिद्द असणे गरजेचे असून त्यासाठी कुटूंबाचे पाठबळ मिळणे तेवढेच महत्वाचे आहे.(Career News)
परिक्षेला सामोरे जात असताना वृत्तपत्र वाचन देखील महत्वाचे आहे. वृत्तपत्रात काय वाचायचे याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. यातून तुम्हाला चालू घडोमोडी वाचण्यास मिळणार आहे. त्याचे ज्ञान वाढविणे गरजेचे आहे. राजकिय, आर्थीक, सामाजीक घटनांचा पाठपूरावा करण्यासाठी वृत्तपत्र हे माध्यम चांगले आहे. मात्र त्याचे सखोल वाचन आत्मसात केले पाहिजे. स्पर्धा परिक्षेला सामोरे जायचे असेल तर त्याची पुर्ण तयारी असणे आवश्यक आहे. विनाकारण मनाची कूवत नसताना तुम्ही परिक्षेत यश मिळवू शकत नाही. ज्ञानाची उपासना करा, ध्येय निश्चित करा, त्याला धेर्याने सामोरे जा , यश तुम्हाला निश्चित मिळेल.(Career News)
शब्दांकन : युनूस तांबोळी