नवी दिल्ली : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ३७ जागा भरल्या जाणार आहेत. वरिष्ठ अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक या पदांवर भरती केली जात आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अशी असेल भरती प्रकिया…
एकूण पदसंख्या – ३७ पदे
कोणत्या विभागात भरती?
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
नोकरीचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
अर्ज करण्याची अखेरची तारीख – ३० सप्टेंबर २०२३
कुठे करावा अर्ज?
या भरती प्रक्रियेत जी रिक्त पदे भरली जाणार आहेत, त्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येऊ शकणार आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाईट www.hindustanpetroleum.com वर भेट द्यावी लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
वरिष्ठ अधिकारी : Ph.d. / M.E./M.Tech आणि अनुभव.
सहाय्यक व्यवस्थापक : Ph.d. / M.E./M.Tech आणि अनुभव.
व्यवस्थापक : Ph.d. / M.E./M.Tech आणि अनुभव.
वरिष्ठ व्यवस्थापक : Ph.d. / M.E./M.Tech/ B.E./B.Tech/ M.Sc आणि अनुभव.
मुख्य व्यवस्थापक : Ph.d. / M.E./M.Tech आणि १२/१५/१८ वर्षे अनुभव.
उपमहाव्यवस्थापक : Ph.d. / M.E./M.Tech आणि १२/१५/१८ वर्षे अनुभव.
दरम्यान, या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी www.hindustanpetroleum.com वर भेट देऊन माहिती घेता येऊ शकते.