पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा ( MPSC)कडून तब्बल 673 जागांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तसेच करु इच्छुणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नोकर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
त्यानुसार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, या पदांसाठी ही भरती (MPSC Recruitment)प्रक्रिया राबविली जाणार आहे.
या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 मार्च 2023 असणार आहे. https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईटवर जावूनअर्ज करता येणार आहे.
या पदांसाठी होणार आहे भरती…
एकूण 673 जागांसाठी हि भरती (MPSC Recruitment)असणार आहेत.
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा , महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा या पदांसाठी ही भरती होणार आहे. .
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालेले असावे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे. याचबरोबर उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?
– Resume (बायोडेटा)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)