पुणे : बँकेत नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण, अजूनही तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्ही पदवीधरसह संगणकाचे ज्ञान असेल तर मग कामच झालं. तुम्हाला एका बँकेत नोकरीची संधी मिळण्याची खूपच शक्यता आहे. कारण, अशाच पात्र उमेदवारांसाठी ही भरती केली जात आहे.
‘इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड’ अर्थात IDBI बँकेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. कार्यकारी-विक्री आणि संचालन यांसारख्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 1000 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
यासाठी 16 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://idbibank.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कार्यकारी-विक्री आणि संचालन.
– एकूण रिक्त पदे : 1000 पदे.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर, संगणकाचे कार्य ज्ञान.
– वेतन / मानधन : पहिले वर्ष – 29,000 दरमहा, दुसरे वर्ष 31300 दरमहा.
– वयोमर्यादा : 20-25 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 07 नोव्हेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 नोव्हेंबर 2024.