पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल आणि तुमच्याकडे दहावी पास असल्याचे प्रमाणपत्र असेल तर मग कामच झालं. कारण, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीत अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी, मुंबई येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बीड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 15 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.mahatransco.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री).
– रिक्त पदे : 15 पदे.
– नोकरीचे ठिकाण : बीड.
– आस्थापना नोंदणी क्रमांक : E04172700347
– शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, एनसीव्हीटी, इलेक्ट्रिशियनमध्ये आयटीआय.
– वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन नोंदणी.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 17 डिसेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 डिसेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता (हार्ड कॉपी) : कार्यकारी अभियंता, ४०० के. व्ही. ग्रहण केंद्र संवसु विभाग गिरवली, मुकुंदराज नगर गिरवली, ता. अंबाजोगाई जि. बीड-४३१५१९.