नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. कारण ‘ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड’मध्ये रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. ONGC ने शिकाऊ उमेदवारांच्या पदांसाठी भरतीसाठी बंपर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. तुम्हीही पदवीधर असाल तर तुम्हालीही संधी मिळू शकते.
या पदांसाठी उमेदवार ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ONGC भरती अंतर्गत एकूण 2500 पदे भरली जाणार आहेत. नोंदणी प्रक्रिया 1 सप्टेंबरपासून सुरू झाली. यासाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार 20 सप्टेंबर किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतो.
ओएनजीसी अप्रेंटिससाठी काय पात्रता?
पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही विद्यापीठात B.A/B.Com/B.Sc/B.B.A/ B.E./ B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. डिप्लोमा अप्रेंटिस या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित शाखेत डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा काय?
20 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे दरम्यान असावे.
कशी असेल निवड प्रक्रिया?
या भरतीमध्ये, अधिसूचनेत विहित केलेल्या पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे शिकाऊ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. कोणत्याही दोन उमेदवारांचे गुण समान राहिल्यास वयाने मोठ्या असलेल्या उमेदवाराचा विचार करता येईल.