पुणे : कोल्हापूर महानगरपालिकेत अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली जात आहे. त्यानुसार, सध्या तीन रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत तुम्हाला अर्जही करता येणार आहे.
कोल्हापूर महापालिकेत लाईफगार्ड आणि पंप ऑपरेटर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 3 रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 11,000 ते 16,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://kolhapurcorporation.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे. मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड होणार असल्याने 6 सप्टेंबर 2024 रोजी संबंधित उमेदवारांनी कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे मैदानासमोर, कोल्हापूर येथे समक्ष उपस्थित राहणे गरजेचे आहे.