पुणे : LIC मध्ये नोकरीची संधी आहे. सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी विद्यार्थी अर्ज करु शकतात.त्यासाठी अर्ज ऑनलाईन मागवले आहेत. ही भरती सेंट्रल, ईस्ट सेंट्रल, ईस्टर्न, नॉर्थ सेंट्रल, नॉर्दन, साउथ सेंट्रल, साउथ ईस्टर्न, साउदर्न एंड वेस्टर्न रीजनसाठी असणार आहे.Job Opportunity in LIC : Apply for Assistant & Assistant Manager Posts!!
एलआईसी एचएफएल एप्लिकेशन फॉर्मसाठी लिंकसुद्धा इथे उपलब्ध असेल तर ही लिंक 25 ऑगस्टपर्यंत ऍक्टिव्ह असेल. जे उमेदवार एलआईसी एचएफएल सहायक भर्ती 2022 आणि एलआईसी एचएफएल एएम भर्ती 2022 साठी यशस्वीपणे अर्ज दाखल करतील त्या उमेदवारांना सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2022 मध्ये ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावले जाईल.
पात्रता –
असिस्टंट – उमेदवारास पदवी परीक्षेत कमीतकमी 55 टक्क्यांनी उत्तीर्ण होणे गरजेचे असेल
असिस्टंट मॅनेजर – उमेदवार पदवी परीक्षेत 60 % मिळवून उत्तीर्ण झालेला असावा किंवा कोणत्याही विषयात पोस्ट ग्रॅज्युएट असला पाहिजे
असिस्टंट मॅनेजर DME – पदवी परीक्षेत कमीतकमी 50 टक्क्यांनी उत्तीर्ण होणे गरजेचे असेल, कोणत्याही विषयात पोस्ट ग्रॅज्युएट असला पाहिजे. मार्केटिंग/फाइनांसमध्ये एमबीए पर्यंतच शिक्षण असेल तर प्राधान्य दिल जाईल
पगार –
सहाय्यक पदासाठी 33,960 रुपये महिना असा पगार असेल, असिस्टेंट मॅनेजर पदासाठी जवळपास 80 हजार रुपये महिना पगार देण्यात येईल. वयाची मर्यादा दोन्ही पदांसाठी 21 ते 28 वय असायला हवी, तर DME पदासाठीची वयोमर्यादा 21 ते 40 ठेवण्यात आले आहे.
महत्वाच्या तारखा –
04 ऑगस्ट 2022 : एलआईसी एचएफएल रजिस्ट्रेशन सुरू
25 ऑगस्ट 2022 : एलआईसी एचएफएल रजिस्ट्रेश करण्याची शेवटची तारीख 7 ते 14 दिवस आधी एलआईसी
एचएफएल एडमिट कार्डची तारीख सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2022 : एलआईसी एचएफएल सहायक परीक्षा