पुणे : कृषि उत्पन्न बाजार समिती, गडचिरोली येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
गडचिरोलीतील कृषि उत्पन्न बाजार समितीत निरीक्षक, पर्यवेक्षक, सांख्यिकी या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला गडचिरोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, 20 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 1,22,800 पर्यंत पगारही मिळू शकणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबतची जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शी, जि. गडचिरोली या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. या पदांसाठी पदवीधर असणे गरजेचे आहे.