पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर आज आम्ही तुम्हाला एका शासकीय विभागात रिक्त पदाबाबत माहिती देणार आहोत. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई येथे सहाय्यक निबंधक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 55 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक निबंधक.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी, कायद्यातील पदवी आणि एमबीए.
– वेतन / मानधन : दरमहा 55,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : किमान 25 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑगस्ट 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://nclt.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.