पुणे : चांगल्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला ज्या विभागात भरती निघाली त्याची माहिती देणार आहोत. निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.
नागपूर महानगरपालिकेत एका रिक्त पदावर भरती केली जाणार आहे. या विभागात भूसंपादन सल्लागार हे पद भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : भूसंपादन सल्लागार.
– एकूण रिक्त पद : 01 पद.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर, सरकारी सेवेतून निवृत्त.
– वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 20 सप्टेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : अतिरिक्त आयुक्त (जनरल), सिव्हिल लाइन्स, एम.एन.पी. नागपूर यांचे कार्यालय.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://www.nmcnagpur.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.