नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण ‘कोल इंडिया लिमिटेड’ने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीच्या 560 रिक्त पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी 13 सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर असणार आहे. कोल इंडिया लिमिटेडच्या https://www.coalindia.in वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे. या अधिसूचनेनुसार, कोल इंडिया लिमिटेडमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी उमेदवारांनी गेट परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी अंतिम निवड गेट परीक्षेच्या गुणांवर आधारित असेल.
काय असावी पात्रता?
अधिसूचनेनुसार, कोल इंडिया लिमिटेडमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी उमेदवारांनी किमान 60 टक्के गुणांसह मायनिंग/सिव्हिल इंजिनीअरिंग किंवा जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी किंवा जिओफिजिक्स किंवा एम.टेक. यासोबतच गेट परीक्षा उत्तीर्ण होणेही आवश्यक आहे.
एकूण पदसंख्या किती?
खाणकाम – 351
सिव्हिल – 172
भूविज्ञान – 37
एकूण रिक्त जागा – 560
वयोमर्यादा काय?
सर्वसाधारण आणि EWS- 31 ऑगस्ट 2023 रोजी कमाल 30 वर्षे
ओबीसी नॉन क्रीमी लेयर – ३३ वर्षे
SC/ST-35 वर्षे
अपंग सर्वसाधारण – 40 वर्षे
अपंग ओबीसी नॉन क्रीमी लेयर – ४३ वर्षे
अपंग SC/ST-45 वर्षे
किती मिळेल पगार?
कोल इंडिया लिमिटेडमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदावर भरती झाल्यानंतर वेतनश्रेणी रुपये 50,000-1,60,000 असेल. प्रशिक्षणादरम्यान दरमहा 50 हजार रुपये पगार मिळू शकणार आहे.