Horoscope Today : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर काहींसाठी वाईट असू शकतो. आज तुम्हाला कोणत्या समस्यांना समोरं जावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे लाभ मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य.
मेष : उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणारांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा बेपर्वाईपणा राहील. प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे.
वृषभ : नोकरीत बढतीची बातमी मिळेल. कुटुंबातील वाद आज संपतील. आज भाग्य 77 टक्के तुमच्या बाजूने असेल.
मिथुन : बँकिंग क्षेत्राशी संबंधित नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला असेल. नोकरदारांना नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.
कर्क : आज ऑफिसमध्ये सहकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुमची खूप प्रगती होईल. घराबाहेर पडताना घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा नेहमी आशीर्वाद घ्या. तुमची सगळी कामं पूर्ण होतील.
सिंह : तुम्हाला आज कदाचित प्रमोशनची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप उत्साही असाल. तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका.
कन्या : आज तुमच्या कामावर तुम्ही थोडे चिंतित होऊ शकता. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी फार मोकळेपणाने बोलू नका आणि राजकारणापासून दूर राहा.
तूळ : आज चतुष्पाद करण असल्याने व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कर्ज हवे असणारांना त्याची तरतूद करता येईल. फक्त अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले पडेल.
वृश्चिक : आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे.
धनु : आज चंद्रबल अशुभ असल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. नोकरीनिमित्त घराबाहेर रहाण्याचे योग येतील.
मकर : आज तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता, जिथे तुमच्या मनाला खूप समाधान मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो.
कुंभ : आज शिव योगात तुमच्या उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील.
मीन : थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल.