Horoscope Today : आज शारदीय नवरात्रारंभ अर्थात घटस्थापनेचा योग आहे. आजचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. ग्रहांच्या हालचाली बघता आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणारा आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस किती खास असणार आहे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य.
मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी शिक्षणामध्ये थोडे फार अडथळे येण्याचा असणार आहे. महिलांचा घरा काम करताना बराच वेळ जाईल. बँकेत कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील.
वृषभ
उद्योगावार विशेष प्रेम असेल, अतिशय व्यावहारिक राहाल, त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. नोकरीत एका नव्या समुहाशी आपला संबंध जुळण्याचा योग आहे.
मिथुन
कष्टाची पर्वा न करता परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा तुमचा काळ आहे. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. आपल्या व्यसनांना आवर घाला.
कर्क
लेखकांना त्यांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारे लिखाण करता येणार. नोकरी व्यापारात योग्य प्रतिसाद मिळेल. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल.
सिंह
आज सध्या उजळवून टाकणाऱ्या अशा घटना घडणार आहेत. विद्यार्थ्यांनी जोरदार अभ्यास करायला हवा. घरगुती उपयोगी वस्तु खरेदी कराल. सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण होतील.
कन्या
नोकरीमध्ये तुम्ही वरिष्ठांची मर्जी जिंकाल. धंद्यात नव नवीन कामे मिळतील. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. दिवस धगधगीचा आणि धावपळीचा राहील. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्या.
तूळ
आजूबाजूला आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढवण्यावर भर असणार आहे. नवीन योजना फायदेशीर ठरतील.व्यापारात काही नवीन भागीदारा सोबत संबंध प्रस्थापित कराल. गृहसौख्य जोडीदारा कडून सहकार्य लाभेल.
वृश्चिक
घरामध्ये दुरुस्तीची अनेक कामे निघणार असून त्यामुळे घरात जास्त वेळ जाणार. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. संगीत कार व गायक वादक यांना संधी मिळेल.
धनु
व्यवसाय नोकरी बाबत नवीन धोरणांचा वापर कराल आणि त्याची पूर्तताही होईल. प्रेमप्रकरणात कुटुंबाच्या विरोधात जावून कठोर निर्णय घ्यावे लागतील.
मकर
गोड बोलण्यामुळे इतरांची मनं जिंकून घ्याल, घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी समाधानी असाल,
कुंभ
चैनीच्या वस्तूंची खरेदी करणार. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. आर्थिक व्यवहारात सावधानी बळा. नोकरीत दुसऱ्यावर रोष करू नका. वाईट संगती पासुन सावध रहा.
मीन
घरामध्ये मंगल कार्य ठरल्यामुळे उत्साही व आनंदी वातावरण असणार आहे. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत.