Horoscope Today : गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. आज नवरात्राची सहावी माळ आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर काहींसाठी वाईट असू शकतो. आज तुम्हाला कोणत्या समस्यांना समोरं जावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे लाभ मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य.
मेष : विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. आज दुसऱ्याच्या मताशी सहजासहजी तुम्ही सहमत होणार नाही.
वृषभ : कोणाच्याही सांगण्यावरून तुमच्या जोडीदारावर संशय घेऊ नका. शब्द हे शस्त्र आहे याची जाणीव ठेवावी लागेल. थोडी मानसिक अस्थिरता ही जाणवेल.
मिथुन : आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास शरीराला थोडा वेळ विश्रांती द्या. तुम्हाला पाण्याची अॅलर्जी सुद्धा होऊ शकते.
कर्क : विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यायला हवं. तरुणांबद्दल बोलायचं झालं तर, ते नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या चौकस स्वभावामुळे अनेक ठिकाणच्या बातम्या मिळवाल.
सिंह : विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे खास लक्ष द्यायला हवं आणि चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून कोसो लांब राहयाला हवं. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
कन्या : आज तुमच्या कामावर तुम्ही थोडे चिंतित होऊ शकता. कलाकारांच्या जीवनात स्फूर्तीदायक घटना घडतील. महिलांना पोषक ग्रहमान लाभेल.
तूळ : आज चतुष्पाद करण असल्याने व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कर्ज हवे असणारांना त्याची तरतूद करता येईल. फक्त अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले पडेल.
वृश्चिक : आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे.
धनु : आज चंद्रबल अशुभ असल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. आज तुमच्या पुढे कोणी आवाज उठवू शकणार नाही.
मकर : मन प्रसन्न राहिल. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल.
कुंभ : आज शिव योगात तुमच्या उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा.
मीन : थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल. धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल.