सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च महिना चांगला पण अडचणींचा असणार आहे. तुम्हाला वादांपासून दूर राहावे लागेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागेल. पण, महिन्याच्या शेवटी तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि सर्वकाही ठीक होईल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाईल. तुमचे आरोग्य मार्च महिन्यात बिघडू शकते.
करिअर
मार्च महिन्यत कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांसोबत वाद घालणं टाळा, थोडं सावध राहा. 14 मार्चपासून आठव्या भावात सूर्य-राहूचा ग्रहण दोष असल्याने महिन्याच्या मध्यात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात वरिष्ठ तुमच्यावर अधिक लक्ष ठेवतील. सहकारी तुम्हाला एखाद्या वादाच्या परिस्थितीत ढकलू शकतात. तुम्ही कार्यालयीन राजकारणाचे बळी होऊ शकता. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहून विचारपूर्वक पाऊलं उचलावी लागतील. 14 ते 25 मार्च दरम्यान नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील.
विद्यार्थ्यांसाठी महिना कसा?
14 मार्चपर्यंत तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती क्षमता कमी होईल, त्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. अभ्यासासाठी विशेष वेळ काढावा. कठोर परिश्रम आणि नियमित अभ्यासामुळे तुमचे चांगले दिवस पुन्हा सुरू होतील आणि लोक तुमच्या यशाकडे बघून प्रभावित होतील. 14 ते 26 मार्च दरम्यान बुधादित्य योग बनत असल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्यांना या काळात चांगली संधी मिळेल आणि अभ्यासात यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती होईल.
आरोग्य आणि प्रवास जीवन
7 ते 25 मार्च या काळात प्रवास करताना वाहन जपून चालवा, अन्यथा दुखापत होऊ शकते. जुनाट आजारांनी त्रस्त लोकांना अधिक काळजी घ्यावी लागेल. काही लोकांना झोप न लागणं आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहणं तुम्हाला महागात पडू शकतं.