मेष: आज आपणाला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
वृषभ : काहींना एखादी चिंता सतावेल. आरोग्य जपावे. मन अशांत राहील. प्रवास टाळावेत. कामाचा व्याप वाढणार आहे.
मिथुन : प्रियजन भेटणार आहेत. नवीन परिचय होतील. काहींना विविध लाभ होतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात.
कर्क : तुमचा प्रभाव वाढणार आहे. कामाचा उरक मनोबल वाढविणार आहे. काहींना अनपेक्षितपणे मान-सन्मान लाभेल.
सिंह : मानसिकता सुधारेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहेत. आनंदी व आशावादी राहणार आहात.
कन्या : मानसिक अस्वस्थता वाढणार आहे. मनोबल कमी राहील. आरोग्य जपावे. कोणत्याही गोष्टीचा अतिताण घेऊ नये. कोणावरही अवलंबून राहू नये.
तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल, आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.
वृश्चिक : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना अनावश्यक गोष्टीत मनस्ताप संभवतो. मनोबल कमी असल्याने कामात लक्ष लागणार नाही.
धनु : मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना विविध लाभ होणार आहे. नवीन परिचय होणार आहेत. आर्थिक अंदाज अचूक ठरतील. आनंदी व आशावादी राहाल.
मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. आनंदी राहाल.
कुंभ : चिकाटीने कार्यरत रहाणार आहात. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम राहील. काहींना नातेवाइकांना भेटण्याची सुसंधी लाभणार आहे.
मीन : आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. काहींना अपेक्षित फोन व मेसेजेस करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.